Marathi Charolya

Anyone looking for heart touching Marathi Charolya then you came to the right spot.Marathi Charolya is nothing but the short poem or can say an paragraph of poem written in marathi.For single it is call charoli or else called charolya .Marathi charolya is one of the best section of marathi articles used worldwide . There are different types of marathi charolya but here I am only giving Some of mix Marathi charolya’s. So Here have a look below For Marathi Charolya’s :-

Charolya १.

प्रेम करावे डोळसपणे
त्यात नको घाई,
फसवणूक झालीच तर
त्याला ग्राहक मंच नाही.

बंध तुझे माझे
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत.

होकारांला शब्दांना
महत्व नसते
दाटल्या भावानांना
काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात
हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची
गरज नसते .

चंद्र आणि चांदण्याचे खेळ
आता जुने झाले
तुझ्या येण्याने माझ्या
गजबजलेल्या शहराचे रस्ते
आता तुझ्या जाण्याने सुने झाले

रात्रभर तूझ्या आठवणीत मी
ताऱ्यानांसुध्या झोपू दिले नाही
रातभर त्या जागल्या पण
माझा विरह त्यांना कळलाच नाही

तू बरोबर नसतांना तुझ्या सोबत
फक्त तुला पाहनं
आणि नसताना तुझ्यासोबत
आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलण.

छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हव असत,
असंख्य चांदण्या भरूनसुद्धा
आपल आभाळ रिकाम असत.

चंद्राच्या रुपात मला
तुझं मनमोहक रूप दिसाव,
माझं मन त्यात मग
तुकडा तुकडा फसाव .

Marathi Charolya Image

Marathi Charolya

रक्ताची नाती आता
घटके घटकेला बदलत आहे,
प्रेम करणारेही आता
हातात सुरा, तेजाब घेऊन धावत आहे.

नभा नभात सूर नवे,
प्रत्येक चांदनित तेज नवे,
आयुष्यात हे पर्व नवे,
प्र्यत्येक दिवसात चेय्तान्य नवे.

थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते..
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगलेले होते…
भातकुलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते…

तेव्हा उमगले ते घर

माझ्या प्रिय मित्राने बांधले होते….

थोर महात्मे होऊन गेले
चरित्र त्यांचे पहा जरा,
एक तरी गुण अंगी घ्यावा
हाची सापडे बोध खरा !

प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घटक ठरत,
पण ते तस बसवलं नाहीतर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरत.

पळून पळून घड्याळ
इतकं थकत असत,
चावी द्यावची विसरली तर
ते सुद्धा मध्येच थांबून बसत .

तुझ्या मनाला माझ्या मनाचा
रस्ता चं कळू दे
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग
ओंजळ पूर्ण भरू दे….

तुझ्या परमाची चाहूल लागताच
झाडे वेळी हळू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द जुळू लागतात .

प्रेमासाठी जगतात सगळे
प्रेमासाठी मारतात सगळे,
एक दिवस गेल्यानंतर
दुसरीला शोधतात सगळे.

वादळ जेवा येतात तेव्हा आपल्या
मातीत घट्ट रुजून राहायचं
असत,ती जितक्या वेगाने येतात
तितक्याच वेगाने निघूनही जातात .
वादळ महत्वाच नसत ;
प्रश्न आपण त्याचाशी
कशी झुंज देतो आणि
त्यातून कितपत बरया अवस्थेत
बाहेर येतो याचा असतो .

कुणीची कसा दिसव यापेक्षा
कसा असाव याला महत्व आहे,
ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त
कसा नसाव याला तरी नक्कीच महत्व आहे.

पाण्यात राहायचे तर मशीशी
नुसती मैत्री करून भागत नाही
तर स्वताला मासा बनाव लागते .

निळ्या निळ्या आकाशात,
गर्द काळे ढग,
गर्दी करून दाटलेत ….
वेड्या माझ्या मनालाही,
नव्याने आता ,
प्रेमाचे नवे धुमारे फुटलेत .

नेहमी डोक्यांनी विचार करू नये
कधी भावनांना वाव द्यावा,
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा,
घराभोवती कुंपण हव
म्हणजे आपल जग ठरवता येत,
बाहेर बरबटलेल असल तरी
आपल्यापुरत सावरता येत.

पाण्याच वागण
किती विसंगत
पोह्ण्यारल्या बुडवून
प्रेताला ठेवतो तरंगत.

आपल्याला काही हव असंण
म्हणजेच आपल जगन आहे,
येनाऱ्या प्रय्तेक क्षणाकडे
आपल काही मागण आहे.

प्रत्येकाला एक आभाळ असाव
कधी वाटत तर भरारन्यासाथी,
प्र्तेकाला एक घरात असाव
संध्याकाळी परत्न्यासाठी.

आजकाल खरच काय होतंय
ते काळातच नाही.
दिवस आणि रात्रीतलं
फरकच काळत नाहीच …
काय करतो आहे हे समजत नाही
काय कराव ते उमगत नाही …
माझ्यातला मी सापडतच नाही मला ,
तहान आणि भूक लागतच नाही मला…
तारीची मन व्याकूळ होत कुणासाठी,
दिवस रात्र जीव झुरतो तिच्यासाठी …
यालाच जर प्रेम म्हणत असतील
तर होय मी खरच प्रेमात आहे
जी गो हसते आहे
थोडीशी लाजते आहे
फक्त माझ्यासाठी….

Charoli

काही नाती अशी असतात
कि ती दोन जन्म
सोबत राहून सुधा कुठेतरी
अपूर्ण असतात ,
आणि काही नाती दोन
क्षणाच्या भेटीत
दोन जन्म पुरेल इतके प्रेम
देऊन जातात ….

हसण्याची इच्छा नसली तरी
हसावे लागते
कसे आहे विचारले तर
माजेत म्हणावे लागते
जीवन एक रंगमंच आहे इथे
प्रत्येकाला नाटक
करावे लागते .

समुद्रातल सगळ पाणी
कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजान जर ते पाणी
आता येऊ दिल तर ते जहाज
बुडल्या शिवाय राहत नाही
तसाच जगातले सगळे नकारात्मक विचार
तुम्हाला हरवू शकत नाही
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही
तुमच्या मनात प्रवेश देत नाही .

काही शोधायचे नाही ,सारे इथेच येणार
काही मागायचे नाही,माझा हातच देणार !
दिल्ली उलटली आता,प्राण लागले पाझर
आता घागरीत भरे ,सारा रूपाचा सागर !
काहीनाही बोलायचे काही ,मौन निळाइत गाते
दळी चांदण्याचे पीठ , हटविण माझे जाते !!

जीवन जगण्याची आशा आहेस तू ,
माझ्या हृदयाची चावी आहेस तू ,
जीवनाची माझ्या कोमल गरज आहे तू ,
माझ्या विचारापेक्षाही सुंदर आहेस तू .

Charolya

काळी उमलण्याच स्वप्न पाहत
वेद चंद्र रात्रभर जगात होता
काळी उमल्णारच असा विश्वास होता
सकाळ झाली ,कळी उमलली
पण पाहायला चंद्र कुठे होता?

मोर धुंध होऊन नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं ?
कोकिला सुंदर गाते म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करत बसायचं नसत ग
प्रत्येकच वेगळेपण असत ग .

भाषा प्रेमाची आज मला कळते  ,
तळमळत मन माझे तुझ्याकडे वळते  …
दूर असूनही मन माझ्याशी जुळते ,
आठवणीतही खरच तुझ्या भेटीचे मन मिळते .

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *