Marathi Virah Kavita

आठवण माझिही येइल मी गेल्यावर…!

आठवण माझिही येइल मी गेल्यावर…!
खरे प्रेम केल्याचे असेल हे फळ……
प्रत्येक प्रेम करानार्यांने जरुर वाचावे…

आठवण माझीही येइल मी गेल्यावर…!
रात्रि झोपेतून दचकुन मी जागा होतो,
अणि तुला या अंधारात शोधायचा प्रयत्न मी करतो,

हताश होउन मी पुन्हा झोपायचा प्रयत्न
करतो,
तेवढ्यात एक अश्रू डोळ्यातून गालावर ओघलतो,
सुरु होतो आठवणिचा तो खेळ,
नाही पुन्हा रहात काहिच झोपायचा ताल-मेळ,
असे का होते कि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,
अन त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,
आणि
स्वप्नांच्या दुनियेत बांधलेले घर,
खाडकन फुटावे,
कुठे कमी मी पडत होतो,
प्रत्येक वेळी तुलाच तर मी समजुन घेत होतो,

तुझ्यावर नव्याने येणारा संकटाना,
परतीचा रस्ता मीच दाखवत होतो,
तू केलेल्या प्रत्येक चुकीवर,
माफ़ि मीच मागत होतो,

तुझ्या चुकांनी होणार्या त्रासाने ,
वेळोवेळी मीच रडत होतो,
तुझ्याकडून झालेली चुक तुला
का कधीच दिसली नाही,
माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही
किमंत राहिली नाही,
कामाचा दबाव आहे म्हणून,
तू मला टाळत होतीस,
पण या कारणाखाली,
तूच माझ्या पासून दुरावत होतीस,
काम तेव्हा मीही करत होतो,
पण माझ्या कामाचा दबाव मात्र तुला दाखवत नव्हतो,
वाटत होते तुला माझ्या
साथाची गरज आहे,
मीच तुला समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,
तुझे काम हे कधीच संपले नाही,
आपल्यातील वाढत हे गेलेले अंतर,
हे तर कधीच मिटले नाही,
दरोज झोपताना देवाकडे एकच इच्छा असते,
तू सदैव खुश रहावी हेच माझी मागणी असते,

आशा आहे तु पुन्हा माझ्याकडे परतावी,
पण तु येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,
प्रेम प्रीती माझे संपणार नाही मी मेल्यावर,
पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर…
आठवण माझीही येइल मी गेल्यावर.

कदाचित तुही असाचं विचार करत असशील :

शोना कदाचित तुही
असाचं विचार करत असशील..

छान होतास रे तू,
पण जमलंच नाही मला..
कळत होतं रे तुझं प्रेम,
पण माझंच चुकलं रे जरा..

असा नको विचार करू कि,मी विसरलेय तुला..
मनात खोल कुठेतरी,आठवणीमध्ये साठवलंय तुला..

आठवते मलाही आपले ते सुंदर स्वप्नांचे घर,
तुझ्या खांद्यावरून मी पाहिलेली ती पावसाची सर..

वेळोवेळी तू दिलेली मला हक्काची साथ,
अन अनवाणी वाळूत चालताना माझा धरलेला हात..

हातावर रंग ठेवून उडालेले हे पाखरू,
पण तू एकाएकी असं जगणं सोडू नकोस..
स्वप्न बघ तू नवीन,
तुटलाय मात्र आपल्या घराचा वासा.

आता पुन्हा नको जोडूस,
भेटली ना मी कधीतरी..
पाहून मला तु रडू नको वेड्या,
कसंबसं सावरलंय मी स्वःताला..

आता पुन्हा बांधु नको बेड्या,
आताही तुझी आसवं मला बघवणार नाही ..
तुझे भिजलेले डोळे मला पहावणार नाही ,
धावत येईन मी तुला सावरायला..

स्वःताच्या प्रेमाला रडतांना पाहून,
स्वःताला कसं आवरणार ?
व्हायचं असेल एक तर,
सगळं होईल रे ठिक..

पण वाट नको पाहूस,
माझ्याशिवाय तु चालायला शिक.

प्रेमाचा सागर :

प्रेमाच्या सागरामध्ये,
मात्र आयुष्याची होडी केली…
नकारात्मक वादळ आले…
तिला बुडवून घेऊन गेले…

आयुष्य माझे तळाला,
मी आहे मध्य सागराला…

जीवन मार्ग नाही…

तर मग आता जगायचे तरी कशाला…?
शब्दांचा तो ओंडका,
कूठे मध्यांगी सापडला…

आयुष्याचा तोच किनारा,
जो पुन्हा मला दावला…
जगतो आहे आता,
हे या शब्दांचे हे ऋण…

निरात्म्याचे हे शरिर,
तुझ्यावर प्रेम केले म्हणून…
आता निश्चय केला,
एकांत आयुष्याचा…

पुन्हा नाही ओलांडायचा मला,
अथांग सागर तो प्रेमाचा….
अथांग सागर तो प्रेमाचा…

एका प्रेम कहाणीत ती नसते :

एका प्रेम कहाणीत ती नसते ,फक्त तो असतो
चालता बोलता तिच्या आभासात जगतो
ती तर दिसत नाही ,मग हा कुणाश गप्पा मारतो
विचारल तर म्हणतो ,
मी तिच्यावर प्रेम करतो
तिच्यासाठी जिंकलेले डाव पुन्हा पुन्हा हरतो
प्रत्येक क्षण तिच्याविषयी बोलतो
आठवणीत तिच्या गुपचूप रडतो
दुसर्यांना हसण शिकवून
स्वतःच्या चेहर्यावरच दुख लपवतो
तिच्या फोटोकडे पाहून सारे सुख वाटून घेतो
तिला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो
तीन स्वप्नं यायला यायला उशीर केला म्हणून
तिच्यावर नकळत रागावतो .
तिच्याशी भाडतो अन पुन्हा तिच्यावर रुसतो
गणपतीच्या मिरवणुकीत तिच्याबरोबर मनसोक्त नाचतो
ती आयुष्यभर आनंदी रहावी म्हणून
रोजच्या नमाज मध्ये प्रथांना करतो
डोळे बंद करून नाताळच्या तिला शुभेच्छा देतो
त्याला पाहतानाच काळत
एका प्रेमकहाणीत ती नसते फक्त तोच असतो .

अधुरे प्रेम :

आपणच तोडायला हवेत
आता सारे बंध
दूर सारायला हवा
हळव्या स्मुर्तीचा गंध
अलगद सोडवून टाकू
प्रेमाचे हे रेशीमधागे
कळून पहायलाही काही
ठेवायचं नाही मागे
आपणच रेखाटलेल्या रांगोळीचे
रंग आपणच पुसायचे
पापण्यात अश्रू दडवून
जगासमोर हसायचे
आपणच विणलेल्या स्वप्नांना
आपणच देऊ मूठमाती
या जन्मीच राहिलेलं प्रेम
राखून ठेऊ पुढच्या जन्मासाठी .

तु भेटलीस तेव्हा
मी असाच शांत बसलो होतो
खोल निळ्या डोळ्यान्मधुन
माझा आकाश शोधत होतो
आकाशातील चान्दन्या मधुन
माझा चन्द्र मी मागत होतो…!!
दर्द तुझ्या विरहाचा झेलत
मी अन्तरी वादळात होतो
का कूणास ठाउक
शब्दांपेक्शा डोळ्यानीच् तुझ्याशी बोलत होतो…!!
पावसाच्या प्रत्येक थेम्बात
भीजत मी जात होतो
प्रेमाच्या अथांग सागरात
डुबुन् मी जात होतो….!!
डोल्यान्मधुन अश्रू बनुन
केवळ वाहत जात होतो
ओठान्वर हसु आनुन
मनाला समजवत होतो…!!
तुझा हा हलुवार् स्पर्ष पाहुन
मनातच लाजत होतो
वीचार गर्दीत
स्वताला हरवुन पाहत होतो… !!