Gambhir Kavita

Gambhir kavita for those who have serious mentality and like to read gambhir means serious kavita/poems.Gambhir kavita is one part of kavita which only focuses on seriousness ie. gambhir .

का आलीस तु माझ्या आयुष्यात ,
का आलीस..?
जायचंच होत सोडून साथ ,
तर का धरला होतास माझा हाथ,
प्रेम करायला शिकवलस खर ,
पण स्वतः मात्र करायला विसरलीस का?
कुठे गेले ते सर्व वायदे ,
त्या आठवणी,
कि होता सगळा हा timepass ..
स्वतः पेक्षा देखिल जास्त होता
मला तुझ्यावर विश्वास …..
खरच रे खूप प्रेम होत
तुझ ही माझ्यावर …
म्हणून तर माझा हा जीव
जडला होता तुझ्यावर …
पण मागे आता उरल्या आहेत
फक्त तुझ्या आठवणी..

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व क्षण..
कदाचीत रडशील ही प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता याची परतफेड करशिल..
मान खाली घालशील शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा तहान शमेल तुझया मस्तकातली..
किनारी पोहोचवशील पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे सर्व करतांना क्षणभर का होईनात पण….आठवेल का रे तुला माझा खांदा..?
घामांच्या धारांतुन वाहणारा माझाच अंश तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणिव होईल का रे तुला..?
सर्व काही रीतसर पार पाडशील उघडा-नागडा माझा देह,
उकळुन घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील देखावा सजवशिल, अखेरचा..
माझा आणि तूझा ही माझा आणि तुझा हि-

तुझी प्रेमस्वरुप आई

दुर राहिलेल्या घराला सोडताना

डोळ्यांत दू:खच दु:ख असतं
कोणी नसत आपल इथे
डोळे बंद करून पहा निट
आयुष्याचा सोबती नेहमी मि
आणि माझा एकांतच असतो ..

बोलता बोलता
जाणिजे सर्वंधर्म
तरी दुनियेची लख्तरं
आपूले ठायी…!

आजन्म झिजोनी
दुःखांत भिजोनी
खंगलेले आयुष्य
सेवकाचे भाळी…!

निस्तरावे साहेबाचे काम
परी कामाचे इछीत दाम
मनस्वी प्राप्त होणे
कधीच कधीच नाही…!

ऐसे दासाचे नशिबी
आजन्म वनवास आला
आयुष्य जाहले भकास
वाळवंटापरी…!

तरीही कर्तव्य मानुनि
सेवकाचे भोग जाणुनि
राजाने उभे रहावे केवळ एकदातरी…!!!

शेवटी तु मला विसरलीसच ना..
पण मी तुला विसरु कसा ..??
कसा विसरु त्या जागवलेल्या लांब रात्री..
कशा विसरु त्या आगीच्या उंच ज्वाळा..
कशा विसरु त्या ह्रुदयातून उठणाऱ्या कळा..

काय झाले ?

आसवांचे ,यातनाचे,पाखराचे काय झाले ?
पेटलेल्या पिंजऱ्याचे,वादलाचे काय झाले ?

वालवंटाचा प्रवासी,केवढा हैराण झाला !
चालताना हे अचानक मुगजलाचे काय झाले ?

नेमके ते काय होते जे तुझ्या ओठी ण आले
जन्म ज्यांचा अंत होता ,त्या कथांचे काय झाले ?

शेवटी ते युद्ध होते ..शेवटी युद्धात सांगा
कौरवांचे काय झाले ?पांडवाचे काय झाले ?

पाथतराच्या कोणत्या शहरातला मी राहणारा ,
माझ्या पदऱ्यातल्या फुलपाखराचे काय झाले ?

नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून
लढ रे मना तु हिम्मत साठवून
जाईलही हे वादळ थोडा वेळ घोघांवुन
तग धरायचाय तुला आपल्यांना आठवून
लक्ष्यात ठेव प्रत्येकच वादळला शेवट हा असेलच
अन घाबरला आहेस तरी निट बघ मार्ग तुला दिसेलच
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून
लढ रे मना हिम्मत तु साठवून
माहित आहे दुबळा आहेस तु टिकायला
काहीच नाही आहे रे तुझ्याकडे लढायला
तरी ही ललकारया देत रहा अतिशय जोरदार ओरडून
नको मागे फिरू तु अशी पाठ दाखवून
लढ रे मना हिंम्मत तु साठवून
लक्ष्यात ठेव प्रत्येकच वादळ खुप काहि शिकवितात
प्रत्येक वेळी ते तुमच आयुष्यच बद्लवत
उपयोग कर त्यांचा स्वतालाच तपासायला
काय आहोत आपण? आणि काय होवू शकतो हे आपण ?
नको हाथ पाय गालु रूप
पाळी त्याचे पाहून
स्वार हो त्यांवर लढायचे ठरवून
नको मागे फिरू तु आशी पाठ दाखवून
लढ रे मना हिम्मत तु साठवून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *