G. d. Mdgudkar Kavita

1.

कसला आलाय हा व्हॅलेंटाईन

रोजचं शेड्यूल ट्वेल्व्ह टु नाइन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन,

बापाच्या पैशाची मैत्रिणीला वाईन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन

पिक्चरला जाव तर मरणाची लाईन, कसला आलाय हा व्हॅलेंटाईन

विदाऊट लायसेन्स ड्राईव्हगला गेलो,तिथे पडला शंभरचा फाईन,

कसला आलाय हा हाव्हॅलेंटाईन

 

 

2.

मला वाटतं,
हे आयुष्य अगदी खासगी नोंदवही सारखं असत.
हया जगात पहिल्यांदाच डोळे उघडताना
वहीच पहिलं पान उघडतं
अगदी नवं कोर पान
त्यावर काळ्या शाईने अक्षर उमटतात
जशी मनःपटलावर ती कोरली जातात
वेळोवेळी नव्याने पानं उघडतं जातात
तशी नवी नवी अक्षर त्यावर उमटतात
आयुष्य सरतच असतं…
काही पानं दुमडली जातात, परत कधीही न उघडण्यासाठी
तर काही पानांचे कोपरे दुमडले जातात, पुन्हा परत पाहण्यासाठी
काही पानांत मोरपीस दडलेली असतात
तर काहींत जाळीदार सुकी पानं लपलेली असतात
काहीना सुवाच्य अक्षराची देणगी असते
तर काहींत मनाची अस्वस्थ कहाणी असते
पण काही पानं कोरीच राहतात
मुक्या आसवांचे त्यावर डाग असतात
आयुष्य सरत जात असतं …
आणि पाहता पाहता शेवटच पान देखील मिटत
मिटलेल्या त्या पहिल्या आणि शेवटच्या पानात
सार रहस्य दडलेलंच असतं
आयुष्य सरताच ते त्यात बंद होत
पुन्हा कधीही न उघडण्यासाठी
प्रत्येक आयुष्याच्या नोंदवहीत काहीतरी दडलेलं असतं.

3.

नित्य या त्याच्या येण्याने
रस्ते सारे निसरडे होते..
रस्ते सारे हिरवे म्हणता
काट्याकूट्यांनी त्रस्त होते…!!!

सप्तरंगाचे मनोहर कोडे
ढगाखाली झाकाळले गेले होते..
धुक्याचे नाजूक वस्त्र आता
पावसाच्या धास्तिने गायब होते…!!!

पाउस मोजका मोजका म्हणता
सर्वत्र पाण्याचे लोट होते..
झाडाखाली फूलणारे प्रेम
अतीवपणामुळे करपले होते…!!!

तावदानातल्या त्या पावसाचे
थेंब हळूच काचेवर येत होते..
पाउस तो पहिला पहिला म्हणता
थेंबाने दृश्‍य सारे धूसर होते…!!!